आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आग लागल्याची घटना:औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत भीषण आग, जीवितहानी टळली; सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी या कंपनीत सोमवारी सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. कंपनीमध्ये बाजूला ठेवलेले कार्पेट, वायर, रोप आणि भंगारावर भट्टीमधून पडलेली आग थेट पडल्याने भीषण आग लागली. दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांत या आगीवर नियंत्रण मिळविले.

कंपनी परिसरात मुबलक पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग वाढतच गेली. कंपनी व्यवस्थापनाने अग्निशमन दलास पाचारण केले. वायररोप, कार्पेट, तारपिन, लोखंडी डस्ट, भंगार इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. आग लागलेले भंगार, लोखंडी डस्ट, वायर तसेच इतर सामान यांना कूलिंग करण्याचे काम पाच वाजेपर्यंत चालू होते. आगीमध्ये जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली फायरमन संतोष काळे, विठ्ठल कांबळे, नागेश घुगे, संदीप दराडे तसेच वाहनचालक अशोक वाघमारे यांनी आग आटोक्यात आणली.

बातम्या आणखी आहेत...