आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:महापुरुषांच्या अवमानप्रकरणी गुन्हे दाखल करा; छावा संघटनेची मागणी

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखंड हिदुस्तानचे आराध्य दैवत, विश्ववंदनीय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि खोटा इतिहास सांगणारे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याविरुद्ध अखिल भारतीय छावा संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून दोन्ही वाचाळवीरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

वादग्रस्त वक्तव्यांचे दोन दिवसांपासून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असतांना सोमवारी छावाचे जिल्हा संघटक रोहित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पाठवलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.

विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडून वारंवार महापुरुषांचा अवमान होणे हे देश आणि राज्याला शोभणारे नसून त्यांना तात्काळ महाराष्ट्रातून पदमुक्त करावे, नसता छावा तर्फे त्यांचे कपडे फाडले जातील, असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे माफीची पत्रे पाठवली होती. असा धादांत खोटा व चुकीच्या इतिहासाची मांडणी करून भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी शिवप्रेमींच्या जखमांवर मीठ चोळले आहे. याप्रकरणी दोन्ही व्यक्तींरुद्ध गुन्हे दाखल करा, अशी मागणी छावाचे जिल्हा संघटक रोहित देशमुख, शहराध्यक्ष शंकर भागडे, तालुकाध्यक्ष पांडुरंग उफाड,उमेश गव्हाणे, कार्याध्यक्ष महादेव कदम, विद्यार्थी आघाडीचे भगवान खोटे, राहुल घायाळ, रोहित इंगळे, राहुल करनाडे यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...