आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

मंठाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समस्त मराठी माणसाची अस्मिता आहेत. अशा महापुरुषांबद्दल अतिशय खालच्या भाषेत फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या विलास जोशी नामक विकृत व्यक्तीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करावा आणि त्याला कठोर शिक्षा करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मंठा पोलिसांना देण्यात आले आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब खवणे, गोविंद मानूरकर, अप्पासाहेब गिराम, आसाराम झोल, राजू घुंगरड, नीळकंठ वायाळ, योगेश वायाळ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...