आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयने चौकशीच्या नावाखाली विनाकारण त्रास देण्याचे काम करीत असल्यामुळे या क्रुरकृत्याचा जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालय जालना समोर निदर्शने करण्यात आली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आ. नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार रोजी संपुर्ण राज्यात केंद्र शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जालना जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी माजी आ. नामदेव पवार यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नामदेव पवार, भिमराव डोंगरे, सत्संग मुंढे, शेख मेहमूद, राजेंद्र राख, सुषमा पायगव्हाणे यांनी आपल्या भाषणातून केंद्र सरकारचा तिव्र निषेध करून काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणा दिल्या. देशमुख म्हणाले, केंद्र सरकारने काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांना ईडीच्या नावाखाली विनाकारण त्यांचा छळ करीत आहे. ही बाब संपुर्ण देश केंद्र शासनाचा दडपशाहीचा प्रकार बघत आहे. यापुढे काँग्रेस नेत्यांचा छळ केल्यास जिल्ह्यामध्ये जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी राजेंद्र राख, शेख महेमूद, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रभाकर पवार, एकबाल कुरेशी, वसंत जाधव, निळकंठ वायाळ, बाबासाहेब गाडगे, विठ्ठलसिंग राजपुत, त्रिंबक पाबळे, संतोष अन्नदाते, रामप्रसाद खरात, कृष्णा पडूळ, राजेश काळे, बदर चाऊस, जावेद बेग, आनंद लोखंडे, शेख शमशोद्दीन, नारायण वाढेकर, विनोद रत्नपारखे, अरूण मगरे, शेख शकील, शितलताई तनपुरे, चंदाताई भांगडीया, नंदाताई पवार, मंगलताई खांडेभराड, संगीताताई डोंगरे, संगीताताई कांबळे, मंदा पवार, शरद देशमुख, अशोक उबाळे, शेख जावेद बागवान, फकीरा वाघ, सुरेश गवळी, बाबु जाधव, किशन जेठे, अब्दुल रफिक, धर्मा खिल्लारे, सय्यद करीम बिल्डर, संजय गायकवाड, अजिम बागवान, समाधान शेजुळ, रहिम तांबोळी, बाबासाहेब सोनवने, चंद्रकांत रत्नपारखे, गणेश चांदोडे, अनिल कांबळे, राजु पवार, नदीम पहेलवान, ज्ञानेश्वर तनपुरे, सतिष वाहुळे, शेख इरशाद, शेख अस्लम, शेख इब्राहिम आदीसह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तर जिल्हाभरात लवकरच जेलभरो आंदोलन : देशमुख काँग्रेस पक्षाचे नेते खा. राहुल गांधी यांना नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सक्तवसुली संचालनालयने चौकशीच्या नावाखाली विनाकारण त्रास देण्याचे काम करीत असल्यामुळे या क्रुरकृत्याचा जालना जिल्ह्यात प्रातिनिधीक आंदोलन करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून असे प्रकार थांबवले नाही तर जालना जिल्हाभरात लवकरच जेलभरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.