आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​तात्पुरता दिलासा:अखेर ‘त्या’ पाणी तुंबलेल्या डबक्यात ग्रामपंचायतीने तत्काळ मुरूम टाकला

पिंपळगाव रेणुकाई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्रभाग दोन मध्ये चक्क ग्रामस्थांच्या घरासमोरच पाण्याचा डाबके साचल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. शिवाय साचलेल्या पाण्यामुळे या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने ग्रामस्थांसह लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत वारंवार तक्रारी करुन देखील याकडे ग्रामपंचायतीकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याने दिव्य मराठीने सोमवारी याबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित करीत ग्रामपंचायत पदाधिकारी खडबडून जागे झाले. तत्काळ साचलेल्या पाण्यात मुरूम अंथरला. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ तसेच गणेश मंडळाने समाधान व्यक्त केले आहे.

तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई हे गाव नेहमीच विविध माध्यमातून सतत जिल्हयाच्या नकाशावर झळकत असते. दरम्यान येथील मिरची बाजारामुळे हे गाव राज्यात प्रसिद्ध आहे. माञ येथील ग्रामस्थांना मिळणाऱ्या मुलभुत सोयी-सुविधा समाधानकारक नसल्याने गाव तसेच चांगले माञ समस्यांवाचुन पांगले असे म्हण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे. गावात सध्या विजेच्या प्रश्नांसह अनेक लहान-मोठे प्रश्न ताटकळत उभे आहेत. विशेष म्हणजे गावात शासनाचे लाखो रुपये खर्च करुन उभ्या केलेल्या स्वच्छतागृहाची देखभाल अभावी मोठी दुरावस्था झाली आहे. याकडे देखील ग्रामपचायतीचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यातील सर्वात मोठा बाजार भरतो त्यापासून ग्रामपंचायतीला चांगला महसुल देखील मिळतो.

परंतु बाजारात येणाऱ्या ग्राहकांना व व्यापाऱ्यांना या ठिकाणी कुठल्याही सोयी-सुविधा मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. थोडा जरी पाऊस पडला तर बाजारात चिखल साचतो याचा ञास बाजारात येणाऱ्या ग्राहकांना तसेच व्यापाऱ्यांना सहन करावा लागतो.ग्रामपंचायतीने बाजारात ज्या ठिकाणी पाणी साचत असेल अशा पाण्याचा निचरा करण्याची व्यापाऱ्यांची मागणी आहे. दरम्यान मागील अनेक महिन्यापासुन प्रभाग क्रमांक दोन मध्ये राहणाऱ्या ग्रामस्थांच्या घरासमोरच मुख्य रस्त्यावरच मोठे पाण्याचे डबके साचले होते. त्यामुळे या पाण्याचा उग्रवास सुटून परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना या ठिकाणी एखादा सार्वजनिक कार्यक्रम घ्यायचा तर मोठी अडचण निर्माण होत असे. दरम्यान साचलेल्या पाण्यामुळे लहान-मुले,अबाल वृद्ध यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण वाढले होते. याबाबत ग्रामपंचायतीडे वारंवार तक्रारी करुन देखील काहीच उपयोग होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता. अखेर ग्रामपंचायतने तत्काळ मुरुम टाकून प्रश्न मिटवला आहे.

मुरुम आणून टाकल्याने तात्पुरता प्रश्न सुटला
मागील अनेक महिन्यापासुन आम्ही ग्रामपंचायतीकडे याबाबत पाठपुरावा केला होता. परंतु आम्हाला त्यात यश आले नाही. अखेर शेवटी दैनिक दिव्य मराठीत वृत्त प्रकाशीत होताच ग्रामपंचायतीने या ठिकाणी तत्काळ मुरुम आणून टाकला आहे. त्यामुळे सध्या तात्पुरता प्रश्न मार्गी लागला असल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य ताराचंद बेराड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...