आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांचे मागील एका वर्षापासून प्रलंबित असलेले वरिष्ठ वेतनश्रेणीचे ७३६ प्रस्ताव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली मंजूर करण्यात आले आहेत. पात्र ठरलेल्या सर्व शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ यांनी दिली.
वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी तालुकास्तरावरून प्राप्त झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना अध्यक्ष असलेल्या व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रदीप काकडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक कैलास दातखीळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक मंगल धुपे यांचा समावेश असलेल्या विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेऊन प्राप्त प्रस्तावांना छाननी करून मंजुरी दिली जाते. प्राथमिक शिक्षक, प्राथमिक पदवीधर, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांनी त्यांच्या सेवेची बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ दिला जातो. यासाठी संबंधित कर्मचाऱ्याने सेवांतर्गत प्रशिक्षण व एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
निवडश्रेणीच्या प्रस्तांवरदेखील लवकरच कार्यवाही
लवकरच आता निवडश्रेणीच्या प्रस्तावांवरदेखील कार्यवाही केली जाणार आहे. या वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्तावांना मंजुरी देण्यासाठी उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विनया वडजे, सहायक प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन विभाग आर. पी. व्यास, सहायक प्रशासन अधिकारी शिक्षण एम. एम. टोणपे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सामान्य प्रशासन विभाग विलास राणे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण वाल्मीक गिते, सामान्य प्रशासन विभाग आनंद रायते, शिक्षण विभागातील वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्तावाचे काम बघणारे वरिष्ठ लिपिक पंजाब खिल्लारे यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.