आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक समन्वय समितीचा एल्गार:जाफराबाद बीओ कार्यालयाकडून शिक्षकांची आर्थिक पिळवणूक

टेंभुर्णी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात जि.प.शिक्षकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक केली जात आहे. या कार्यालयात प्रत्येक कामासाठी शिक्षकांना पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप जाफराबाद तालुका शिक्षक समन्वय समितीने केला आहे. याबाबत समितीने आक्रमक भुमिका घेत गटशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध एल्गार पुकारला आहे.

याबाबत शिक्षक समन्वय समितीने सोमवारी गटशिक्षणाधिकारयांची भेट घेवून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या निवेदनात शिक्षकांच्या होणारी आर्थिक पिळवणूक थांबविण्यासह सेवापुस्तिका अद्यावत करणे, वैद्यकिय परिपुर्ती देयकांसह अन्य पुरवणी देयक त्वरीत गटविकास अधिकारयांकडे पाठविणे, समग्र शिक्षा अभियानाचे तालुकास्तरावर प्रलंबित अनुदाने त्वरीत खात्यावर जमा करणे, शालेय पोषण आहार देयके दरमहा काढणे, वरीष्ठश्रेणी, निवडश्रेणीचे परिपूर्ण प्रस्ताव त्वरीत पाठविणे, शिक्षकांची टपाली कामे कमी करणे आदि मागण्यांचा समावेश आहे.

यावेळी समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष नसीम शेख, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सुखदेव अवकाळे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिजित साळवे, शिक्षक भारतीचे तालुकाध्यक्ष गजानन गजानन घोडके यांच्यासह दत्तू मुनेमानिक, संजय निकम, रमेश साळवे, गणेश फुकट, गजानन खेडेकर, गजानन डोमळे, दीपक खरात, विजय वैद्य, सोपान शिंदे, भगवान चव्हाण, सावता तिडके, गणेश गवळी, सुरेश बोर्डे, सुनील अंभोरे, किरण तिडके, आर.के.जोशी, एम.एन.शेख, एस.बी.बाविस्कर, आर.जी.व्यवहारे, के.बी.दिवटे, पी.एन.कळंबे, गजानन शिंदे, गणेश पठाडे, अरुण फदाट आदिंची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...