आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:एकात्मिक शेती पद्धतीतून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यांनी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थेर्य मिळविण्यासाठी पशुसंवर्धनातून एकात्मिक शेती पद्धतीचा विकास करणे आज काळाची गरज असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे यांनी सांगितले. कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी,जालना आयोजित एकात्मिक शेती पद्धतीत पशुधनाचे महत्व या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षणात ते बोलत होते.

यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने, निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड यांची उपस्थिती होती. या प्रशिक्षणाचे जालना जिल्ह्यातील पशु संवर्धन विभागातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक या विस्तार कर्मचाऱ्यांकरिता कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे आयोजन करण्यात आले होते. एकात्मिक शेती पद्धतीमध्ये शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कोंबडीपालन, रेशीम उद्योग, फळभाज्या लागवड व फुलशेती इत्यादी व्यावसायिक पिकांचा अंतर्भाव शेतकऱ्यांनी केल्यास त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल असे मत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख एस. व्ही. सोनुने यांनी व्यक्त केले.

तसेच पशु संवर्धनाचे एकात्मिक शेती पद्दतीमध्ये अनन्यसाधारण महत्व असून आज शेतीमध्ये सेंद्रिय कर्ब व मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी पशुसंगोपन काळाची गरज असल्याचे जालना कृषी विभागाचे निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड यांनी या विषयावर उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये उपस्थितांना एकात्मिक शेती पद्धतीची कृषी विज्ञान केंद्राद्वारे विकसित केलेली विविध एकात्मिक शेती पद्धतीची मॉडेल्स या विषयी पशु वैद्यकशास्त्राचे विषय विशेषज्ञ डॉ. एच.एम. आगे यांनी सविस्तर माहिती सांगितली.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडीच्या कार्यक्षेत्रावर असणारी गोपालन संगोपन, शेळीपालन व अर्धंबंधीस्त कोंबडीपालन, अंडी उबवणी केंद्र आदींबाबत सविस्तर माहिती उपस्थित प्रशिक्षणार्थींना येथे भेट देऊन देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एच.एम. आगे यांनी तर डॉ.योगेश आक्षे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातून पशु संवर्धन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...