आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालॉयन्स क्लबचे संस्थापक मेल्विन जोन यांच्या जयंतीनिमित्त आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या मेल्विन जोन फेलोशिप फोटो स्पर्धेत लॉयन्स क्लब जालना प्रेसिडेंट चे सचिव तथा लिओ चे माजी महाराष्ट्र प्रमुख लिओ लॉ. सौरभ शामसुंदर पंच यांना जागतिक पातळीवर प्रथम मानांकन घोषित झाले आहे. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत छायाचित्रासह लॉयन्स च्या सेवा कार्याविषयी लक्षवेधक, प्रभावी संकल्पनेवर आधारित स्पर्धेत १२५ देशांतील ८,५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला. भारत, दक्षिण आशिया, मध्य आशिया, दक्षिण आफ्रिका (ईसामे), यात पहिली चाचणी, तसेच अंतरराष्ट्रीय अध्यक्ष लॉ. ब्रॅन शिअन, लॉयन्स अंतरराष्ट्रीय फाऊंडेशन चे अध्यक्ष लॉ. डग्लस अलेक्झांडर यांच्या नेतृत्वाखालील तज्ञ परिक्षण समितीने अंतिम फेरीत केलेल्या परिक्षणानंतर नुकताच निकाल घोषित करण्यात आला. यात लिओ, लॉ. सौरभ पंच यांनी प्रथम मानांकन पटकावले.
आगामी जुलै महिन्यात बोस्टन (अमेरिका) येथे होणाऱ्या लॉयन्स च्या अंतरराष्ट्रीय अधिवेशनात सदर पुरस्कार वितरित केला जाईल, असे सांगण्यात आले. दरम्यान मागील आठ वर्षांपासून लिओ, लॉयन्स च्या सेवा कार्यात सक्रिय सहभागी असलेल्या लिओ, लॉ. सौरभ पंच यांनी यशाचे श्रेय पालक व भाऊ यांना दिले आहे. जागतिक स्तरावर बहुमान मिळवल्याबद्दल त्यांचे लॉयन्स क्लब प्रांत थ्री. टू. थ्री. फोर. एच. टू. चे प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया, उप प्रांतपाल लॉ. सुनील देसरडा, लॉ. गिरीश सिसोदिया, प्रांत सचिव लॉ. अरुण मित्तल, प्रशासकीय प्रमुख, अग्रविभूषण लॉ. सुभाषचंद्र देविदान, गॅट समन्वयक लॉ. अतुल लढ्ढा, कोषाध्यक्ष लॉ. राजेश कामड, विभागीय अध्यक्ष लॉ. सुनील बियाणी, प्रभाग अध्यक्ष लॉ. विनोद पवार, लॉ. मीनाक्षी दाड, लॉ. दिनेश शिनगारे, लॉ. अमोल बांगड, लॉ. राजकुमार पौळ, लॉ. शिरीष देवळे, लॉ. चंद्रकांत दाभाडे, लिओ जतीन अग्रवाल यांच्यासह जालना लॉयन्स परिवाराने अभिनंदन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.