आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मत:सर्वप्रथम गोल सेट करा; मग परिश्रमाने लक्ष्य भेदा

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रीडा गुण असलेल्या खेळाडूंनी सर्वप्रथम गोल सेट केले पाहिजे. त्यानंतर लक्ष्य भेदण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत, असे मत ऑलिम्पिकपटू सुमंगला शर्मा यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी (७ डिसेंबर) त्यांच्या हस्ते झाले त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले होते.

त्या म्हणाल्या, ‘कोणत्याही क्षेत्रात करिअर करायचे असेल तर ध्येय निश्चित करता आले पाहिजे. पूर्वी आमच्या वेळी तर आधुनिक तंत्रज्ञान नव्हते. आता सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे खेळाडूंनी अखंड प्रयत्नांची जोड द्यावी. क्रीडा स्पर्धांच्या राज्य सरकारच्या दूत नवेली देशमुख म्हणाल्या, आपल्यातील ऊर्जा योग्य दिशेने नेली पाहिजे.

तरुणांचा देश म्हणून भारताची जगभर ओळख आहे. स्वत:सह देशाचे नाव मोठे करता आले पाहिजे. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, डॉ. दीपक. माने, सदस्य डॉ. दिनेश पाटील, डॉ. मोहन अमरुळे, निकाल समितीचे शरद बनसोड, विठ्ठलसिंह परिहार, डॉ. दयानंद कांबळे, संयोजन समिती सदस्य डॉ. उदय डोंगरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...