आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:दरोड्याच्या तयारीतील पाच दरोडेखोर जेरबंद

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील इंदेवाडी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले पाच जण एका झाडाखाली बसले होते. साध्या वेशात चारही बाजूंनी आलेले पोलिस पाहताच सर्वच जण पळू‌ लागले. दीड किलोमीटरपर्यंत पाठलाग करून पाच आरोपी शुक्रवारी जेरबंद केले. एक जण दुचाकी घेऊन पसार झाला आहे.

नांदेडचे दरोडेखोर आल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. राजूसिंग मायासिंग बावरी (२६, रा. गुरू गोविंदसिंगनगर, उमरी, जि. नांदेड), लक्ष्मणसिंग ठाकूरसिंग बावरी (२६. रा. हनुमान गल्ली, उमरी, जि. नांदेड), प्रेमसिंग धरिमसंग खिच्ची (२५, रा. हनुमान गल्ली, बकरी बाजार, उमरी, जि. नांदेड), मेहमूद मौलासाब शेख (२६, रा. इस्लामपुरा, उमरी, जि. नांदेड), बालाजी तोलबा गुंटे (२४) अशी संशयितांची नावे आहेत.

बातम्या आणखी आहेत...