आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:‘फोनपे’वर पाच हजारांची घेतली लाच; संस्थाध्यक्षासह शिपाई अडकला जाळ्यात

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षकाला वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करून वेतनाच्या फरकाचा लाभ मिळवून देण्यासाठी जालना येथील स्व. राजीव गांधी मूकबधिर निवासी विद्यालयाच्या संस्था अध्यक्षाने ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. पैसे आणण्यासाठी आलेल्या शिपायाला ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी बदनापूर येथून ताब्यात घेतले. संशयित संस्थाचालक भास्कर गाडेकर (गिरसगावडी, ता. फुलंबी, जि. औरंगाबाद) हा फरार आहे. शिपाई रंजित प्रताप राठोड (२७, गिरसावडी, ता. फुलंबी) याला ताब्यात घेण्यात आले आहे. ५ हजार फोन पेवर घेतले, ४५ हजार रोख स्वीकारले.

तक्रारदार हा जालना येथील स्व. राजीव गांधी मूकबधिर निवासी विद्यालयात शिक्षक आहे. शासन नियमाप्रमाणे वरिष्ठ शिक्षक वेतनश्रेणी लागू करण्यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना वारंवार विनंती केली. मुख्याध्यापकांनी त्यांना संस्थाध्यक्षास भेटण्यास सांगितले. तक्रारदार हे संस्थाध्यक्षांना भेटण्यासाठी गेले असता, संस्थाध्यक्ष भास्कर गाडेकरने शिपायाच्या फोन पेवर ५ हजार टाकण्यास सांगितले.

बातम्या आणखी आहेत...