आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउपेक्षित लोककलावंतांना न्याय मिळावा त्यांच्या मागण्यांचा विचार व्हावा यासाठी महाराष्ट्र सांस्कृतिक कला अभियान जालनाच्या वतीने जालना जिल्हा परिषदेसमोर २७ डिसेंबर रोजी आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती कला अभियान चे जिल्हाध्यक्ष राम घोडके यांनी दिली आहे.
लोककलावंत आजही उपेक्षित जीवन जगत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती जतन करून स्वतःचे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात मात्र महाराष्ट्र सरकारकडून कलावंतांच्या न्याय मागण्यांकडे दुर्लक्ष होत आहे.कलावंतांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात यावी, मानधन प्रस्तावासाठी लागणारी उत्पन्न प्रमाणपत्राची मर्यादा ४८००० वरून ती एक लाखापर्यंत करावी, कलावंतांच्या विधवा पत्नीस वारसदार प्रमाणपत्र मिळावे व लाभार्थ्यांना मानधन देण्यात यावे,कोरोना काळात शासनाने लोककलावंतांना पाच हजार रुपये अनुदान मंजूर केले होते कलावंतांना मात्र ते अद्यापही मिळालेले नाही. सन २०१९-२० व २०-२१ या वर्षासाठी मानधन यादीतील १४ कलावंतांना अद्यापही पैसे मिळाले नाही ते लवकर मिळावे.
मानधन प्रस्ताव ज्या ज्या वर्षी येतात त्या त्यावर्षी निकाली काढून पूर्ण करण्यात यावे. निवड समितीने मूळ कागदपत्रे तपासून निकषाप्रमाणे प्रस्ताव निकाली काढावेत व लोककलावंतांना महाराष्ट्रभर एसटी बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात यावी अशी मागणीराम घोडके, ज्ञानेश्वर जगताप, सुधाकर डहाळे, नाथ शिंदे, विजय माघाडे,नारायण कुलकर्णी, गणेश शेलार, पांडुरंग पवार, नारायण वाघमारे,अंशिराम कनेरकर,पुंजाराम वाघमारे, रमेश खरात, विनायक सवडे, गजानन मोरे, सुभाषराव नागडे आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.