आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सव‎ संपन्न:लोकगीत, लोकनृत्यात‎ जि.प. मुलांची शाळा प्रथम‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय‎ व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या‎ संयुक्त विद्यमाने १५ ते २९ वर्षे‎ वयोगटातील युवक-युवतींकरीता‎ आयोजित जिल्हास्तर युवा‎ महोत्सवात लोकगीत व लोकनृत्य‎ कलाप्रकारात जालना येथील‎ जिल्हा परिषद प्रशाला मुलांची‎ शाळा या संघाने प्रथम क्रमांक‎ मिळवला. ३ जानेवारी रोजी जिल्हा‎ क्रीडा संकुल हॉल येथे हा महोत्सव‎ संपन्न झाला.

या महोत्सवासाठी‎ राजेभाऊ मगर, रेखा गतखणे,‎ संदिप इंगोले, भक्ती पवार यांनी‎ परीक्षक म्हणून काम पाहिले. तर‎ क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे,‎ संतोष प्रसाद, सोपान शिंदे, नवनाथ‎ गायकवाड, हारूण खान आदींनी‎ परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...