आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नेहमिलन:फुले मार्केटचा प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरू; आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती, जनरल मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने व्यापाऱ्यांचे स्नेहमिलन

जालना4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जनरल मर्चंट्स असोसिएशन जिल्हा जालनाच्या वतीने गुढीपाडवा नवीन वर्षाच्या निमित्ताने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा स्नेहमिलन, सभासद प्रमाणपत्र वितरण जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांच्या अध्यक्षतेखाली जैन भवन, सकलेचानगर येथे पार पडले. यावेळी व्यापाऱ्यांच्या फुले मार्केटचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिले.

समारोहचे उद्घाटन जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष भास्कर अंबेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, व्यापारी महासंघाचे सतीश पंच, अर्जुन गेही, बाला परदेशी, मो. कासीम बावला, महिला आघाडी अध्यक्षा सीमा मोहिते उपस्थित होते. प्रारंभी आमदार गोरंट्याल व मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. सर्व मान्यवरांचा संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष हस्तिमल बंब यांनी केले. आमदार गोरंट्याल म्हणाले की, मी स्वतः व्यापारी असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. व्यापाऱ्यांच्या अडीअडचणीत मी सदैव पाठीशी आहे. अनेक वर्षांपासून फुले मार्केटच्या प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करण्यात आला आहे. महात्मा फुले मार्केट लवकरच उभारू असे शेवटी गोरंट्याल म्हणाले. या कार्यक्रमात सर्व व्यापाऱ्यांना सभासद प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यशस्वितेसाठी संतोष मुंदडा, कैलास मल्लावत, दुर्गा लढ्ढा, प्रमोद गंडाळ, शशिकांत रोडे, अंकुश गुप्ता, श्रीनिवास इंदाणी, पुरुषोत्तम सोसे, सुदर्शन चिप्पा, देवेंद्र सावजी, अनिल शेजूळ, बालाजी लताड, अब्बास खाँ, बाळासाहेब शेळके, पुंजाराम शेळके, नरेंद्र जोगड, आनंद बंब, मनोज बंब आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार सचिव मो. कासीम बावला यांनी मानले, तर सूत्रसंचालन अ‍ॅड. अभय सेठिया यांनी केले.

व्यापाऱ्यांचे शहर ही ओळख
माजी नगराध्यक्ष अंबेकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, जालना जिल्ह्याची ओळख व्यापारी वर्गामुळेच आहे. व्यापारी हा देशाचा आर्थिक कणा आहे. या वर्गाने जालन्याची ओळख देशभरात केली आहे. शिवाय गुणवत्ता आणि विश्वास ही बाजारातील ओळखही निर्माण केली असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...