आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेक द चेन:संचारबंदीचा कालावधी संपल्यावर परिस्थितीनुसार पुढील निर्णय : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ मेनंतर राज्यात कोरोनाची परिस्थिती काय असेल त्यावर ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा निर्णय घेण्यात येईल. गरज पडल्यास ती वाढवली जाईल, असे सूतोवाच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. प्रत्येकाचा जीव वाचावा यासाठी १५ दिवस संचारबंदीचा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. हा निर्णय यशस्वी झाला पाहिजे, यासाठी जनतेने सहकार्य करावे. विनाकारण घराबाहेर न पडता, संसर्ग होईल अशा गोष्टी करू नये. सध्याचा संचारबंदीचा १५ दिवसांचा कालावधी संपल्यावर नेमकी काय परिस्थिती राहील, त्यानंतरच पुढील निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

२ हजार टन ऑक्सिजनची मागणी
केंद्र सरकारकडून १५ एप्रिलपासून ऑक्सिजन पुरवठा सुरू झाला असून कोरोनाची संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्राला २००० ते २२०० टन प्रतिदिन ऑक्सिजन द्यावा, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. सद्य:स्थितीत दररोज किमान ५०० टन ऑक्सिजन पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करत छत्तीसगड, झारखंड, कर्नाटक, गुजरात व तेलंगणातून ट्रेनद्वारे ऑक्सिजन आणण्याचा विचार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प उभारणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासोबत शनिवारी राज्यातील आरोग्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात टोपे माध्यमांशी बोलत होते.ऑक्सिजनची वाढती गरज लक्षात घेऊन हवेतील ऑक्सिजन संकलित करून त्याचे ९८ टक्के प्युरिफिकेशन करून ते रुग्णांना देता येऊ शकेल. अशा प्रकारचे प्लँट उभारण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत,असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...