आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

38 जणांनी केले रक्तदान:जालना येथील रेल्वेस्थानकावर भोजनदान अन् रक्तदान शिबिर

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाज कल्याण कार्यालय जालनाचे सहाय्यक आयुक्त, जिल्हा सामान्य रुग्णालय व बौद्धवासी दशरथरावजी व्यायाम व सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रेल्वे स्टेशन जालना येथे भीम अनुयायांना भोजनदान करून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला.

या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष बंडू सुरडकर यांनी ४३ वेळेस रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी सामान्य रुग्णालयातील डॉ. शेजुळ व रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सिद्धार्थ मोरे यांनी बबन खंदारे यांनी आभार केले.

बातम्या आणखी आहेत...