आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष द:भीम अनुयायांसाठी भोजनदान; रक्तदान शिबिर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज कल्याण कार्यालय जालनाचे सहायक आयुक्त, जिल्हा सामान्य रुग्णालय व बौद्धवासी दशरथरावजी व्यायाम व सांस्कृतिक क्रीडा मंडळ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी रेल्वेस्टेशन जालना येथे भीम अनुयायांना भोजनदान करून रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बौद्ध वंदना घेण्यात आली.

शिबिराचे उद्घाटन अशोक शहाणे यांच्याहस्ते करण्यात आले. तसेच रेल्वे सुरक्षा दल पोलिस निरीक्षक विजय वाघ, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आणि कार्यालयीन अधीक्षक अतिश ससाने, संस्थेचे अध्यक्ष बंडू सुरडकर, पद्माबाई सुरडकर, सिद्धार्थ मोरे, निखिल पगारे, राजेश भिसे, अशोक चांदोडे, बाळकृष्ण कोताकोंडा, शुभांगी घाटे, संतोष वाघ, अमोल चाबुकस्वार, बबन खंदारे आदींची उपस्थिती होती. संस्थेकडून करण्यात येणाऱ्या मागील ४३ वर्षापासून रक्तदान शिबिरे आणि गोरगरीबांसाठी अन्नदानाची स्तुती शहाणे यांनी केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये फार मोठे योगदान असल्यामुळे त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीने त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. संस्थेचे अध्यक्ष बंडू सुरडकर यांनी ४३ वेळेस रक्तदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सामान्य रुग्णालयातील डॉ. शेजुळ व रक्तपेढी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन सिद्धार्थ मोरे यांनी बबन खंदारे यांनी आभार केले.

बातम्या आणखी आहेत...