आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोर्चा:जालन्यात पायी मोर्चा; 4 तास शहर होते बंद

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा विविध स्तरांतून निषेध केला जात आहे. दरम्यान, बुधवारी जालना बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या वेळी पायी मोर्चाही काढण्यात आला होता.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याप्रमाणेच भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्याकडूनही आक्षेपार्ह विधान केले गेले. याचा निषेध करत आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा क्रांती मोर्चा, व्यापारी, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या बंदचे आयोजन केले होते. बंददरम्यान होलसेल किराणा मार्केट, भुसार मार्केट, भाजी मार्केट, खत मार्केट, हमाल-मापाडी, वकील संघ, काँग्रेस असंघटित कामगार संघटना, मराठा महासंघ आदी संघटनांनी याला पाठिंबा दिला.

बातम्या आणखी आहेत...