आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:माजी नगरसेवक मिसाळ यांची हिंदू महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

जालना10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारत हिंदू महासभाच्या जालना जिल्हाध्यक्ष पदावर माजी नगरसेवक तुकाराम मिसाळ यांची नुकतीच निवड करण्यात आली. मस्तगढ येथील हिंदू महासभा संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत सामाजिक कार्यात सक्रिय असलेले काँग्रेसचे माजी नगरसेवक तथा समाजवादी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुकाराम मिसाळ यांची हिंदू महासभेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदावर प्रदेश संघठन मंत्री धनसिंह सूर्यवंशी यांनी निवड केली. सूर्यवंशी यांनी मिसाळ यांना भगवा ध्वज देवुन सदरील जवाबदारी सोपवली.

मी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक राहिलो होतो. त्यानंतर काही कारणास्तव समाजवादी पक्षात प्रवेश घेतला व जिल्हाध्यक्ष पद सांभाळले परंतु हिंदू धर्मावर होत असलेले वारंवार आघात तसेच लव जिहादला विशिष्ट लोक खतपाणी घालत असल्याने हिंदू राष्ट्राची निर्मिती हाच संकल्प मनात ठेवून मी हिंदू महासभेत प्रवेशित झाल्याचे माजी नगरसेवक तुकाराम मिसाळ या वेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...