आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रिप्टोकरन्सी प्रकरणात चार आरोपी घेतले ताब्यात:पुणे, इचलकरंजी येथून तीन गाड्याही केल्या जप्त

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात क्रिप्टोकरन्सी प्रकरणात ११६ जणांची फसवणूक झाली होती. या प्रकरणात प्राप्त तक्रारीनुसार, पुणे, इचलकरंजी येथून चार संशयितांंसह तीन महागड्या गाड्या जालना पोलिसांनी जप्त केल्या. या चौघांनी फसवणूक केल्याचे समोर आले असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जालना जिल्ह्यात प्रमोटर असलेल्या किरण खरात व त्यांच्या पत्नीने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास एकूण रकमेच्या ११ टक्के नफा दरमहा देण्याचे आमिष दाखवले. याशिवाय करन्सी लाँच झाल्यानंतर भारतीय रुपयांच्या तुलनेत अनेक पटींनी परतावा मिळवून देतो, असेही सांगितले गेले होते. तसेच १२ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. ११६ जणांनी तक्रारी केल्या. पोलिसांच्या दोन पथकांनी तपास सुरू केला. या गुन्ह्यात बनावट वेबसाइट तयार करून फसवणूक करणारे आरोपी पुणे व इचलकरंजी येथून ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या ताब्यातून तीन लॅपटॉप, तीन संगणक, ९ महागडे मोबाइल जप्त करण्यात आले.

बँक खाती गोठवली ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींचे व त्यांच्या नातेवाइकांचे विविध बँक खात्यांमधील एकूण ३ कोटी ४४ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. आजपर्यंत झालेल्या तपासात एकूण ५ कोटी ८८ लाख रुपयांची रक्कम निष्पन्न झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...