आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचार लाख:जालन्याच्या व्यापाऱ्याचे साडेचार लाख लांबवले

बीड5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्ह्यातील व्यापारी किराणा दुकानातील खरेदीसाठी मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी बीडला आल्यानंतर शहरातील जालना रोड परिसरात दोन चोरांनी त्यांच्या हातातील साडेचार लाख रूपये असलेली कापडी पिशवी लांबवल्याची घटना घडली. या प्रकरणी नगर पोलिस ठाण्यात चोरांवर गुन्हा दाखल झाला.

व्यापारी विठ्ठल नानासाहेब आर्दड (६७, रा.राजटाकली जि.जालना) यांचे जालना जिल्ह्यात दोन किराणा दुकान आहेत. ते किराणा दुकानातील माल खरेदीसाठी महिन्यातून दोन वेळेस बीड मध्ये येत असतात. मंगळवार ८ नोव्हेंबर रोजी ते खरेदीसाठी दुपारी बीड मध्ये आले होते. जालना रोड परिसरात आल्यानंतर त्यांचे वाहन खराब झाल्यामुळे शहरातील साई पॅलेस परिसरातील एका गॅरेजवर ते थांबले होते.

खराब झालेले दुचाकीचे साहित्य आणण्यासाठी ते रस्त्याने जात असताना, पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन चोरांनी विठ्ठल आर्दड यांच्या हातातील साडेचार लाख रूपये असलेली कापडी पिशवी हिसका देऊन लंपास केली. आर्दड यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दोन चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...