आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीसीटीव्ही:जांबसमर्थ येथील मंदिरावर लागले चार सीसीटीव्ही, 60 दिवसांचे राहणार बॅकअप

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिरातून मूर्ती चोरणारे आरोपी अजूनही सापडले नाहीत. ही चोरी झाल्यानंतर समृद्धी कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सीसीटीव्ही दिले होते. परंतु, ग्रामसेवक, सरपंच, ट्रस्ट यांच्या दुर्लक्षामुळे पाच दिवस सीसीटीव्ही बसले नव्हते. दरम्यान, दिव्य मराठीत २ सप्टेंबर रोजी “जांबसमर्थ २० दिवस अंधारात; ५ दिवसांपूर्वी दिलेले १२ सीसीटीव्ही अजूनही नाही बसवले’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित होताच मंदिरावर १२ पैकी चार सीसीटीव्ही शनिवारी बसवण्यात आले असून अर्धा किलोमीटरपर्यंत देखरेख राहणार आहे. ६० दिवसांचे बॅकअप राहणार आहे. मात्र, वीज गेल्यास बॅटरीअभावी सीसीटीव्ही बंदच राहणार आहेत.

जांबसमर्थ येथील मंदिरातून श्रीराम, लक्ष्मण, साता यासह इतर देवतांच्या सहा धातूच्या मूर्ती चोरीस गेल्या आहेत. स्वत: समर्थ रामदास हे या मूर्तींची पूजा करीत होते. ७०० वर्षांपूर्वीच्या असलेल्या या मूर्ती अजूनही सापडल्या नसल्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिराच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज नसल्यामुळे पोलिसांना तपास करताना कोणताच धागा मिळत नसल्यामुळे अजूनही या चोरीचा तपास लागलेला नाही. दरम्यान, सीसीटीव्ही देऊनही सीसीटीव्ही लागले नव्हते. दिव्य मराठीत वृत्त प्रकाशित होताच जांबसमर्थ येथे १२ पैकी चार सीसीटीव्ही लागले. यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी येतात अन् आदेश देऊन जात आहेत. परंतु, चेअरमन घाटगे यांनी चोरीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली असता, त्यांनी या ठिकाणी गरज लक्षात घेऊन चार सीसीटीव्ही दिले. या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.

१६ दिवस उलटूनही काहीच माग नाही : जांबसमर्थ येथील मूर्ती चोरी प्रकरणात सोळा दिवस उलटूनही काहीच तपास लागलेला नाही. यामुळे मूर्ती कुणी चोरून नेल्या, त्या मूर्तींचे काय झाले, कुणाचा हात आहे या सर्वच बाबी अजूनही अस्पष्टच आहेत. पोलिस त्यांच्या परीने विविध पथके करून तपास करत आहेत. परंतु, अजूनही यात काहीच हाती लागले नसल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.

पुन्हा चोरी होऊ नये म्हणून घेतला पुढाकार
चोरीची घटना झाली म्हणून पाहण्यासाठी गेलाे होतो. मंदिर परिसरात पुन्हा चोरी होऊ नये म्हणून सीसीटीव्ही देण्यात आले. सीसीटीव्ही असल्यास पोलिसांना तपासाला दिशा व गती मिळते. यामुळे सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहेत. - सतीश घाटगे, चेअरमन,समृद्धी कारखाना.

बातम्या आणखी आहेत...