आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेड्या:ऑनलाइन गंडा घालणाऱ्या चार जणांना घातल्या बेड्या

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्रेडिट कार्ड व बँक डिटेल्स घेऊन दोघांची सुमारे पावणेचार लाखांची फसवणूक करणाऱ्या चौघांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. सायबर पोलिसांनी केलेल्या या कारवाईत संशयितांना झारखंडमधून ताब्यात घेण्यात आले. शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

शहरातील विठ्ठल फकीरबा सोनवणे यांना २७ ऑगस्ट २०२२ रोजी एसबीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगून भामट्याने त्यांच्या क्रेडिट कार्ड व बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातून तब्बल एक लाख १८ हजार ५३२ रुपये हडप केले होते. याप्रकरणी सोनवणे यांच्या फिर्यादीवरून चंदनझिरा ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

संशयित कलीमुद्दीन मेहरअलिमिया अन्सारी (५२, रा. चिंचापूर, जि. जामतारा, झारखंड. ह.मु. आलेगाव, जुन्नर, पुणे) यास आलेगाव येथील हॉटेलमधून वेटरचे काम करताना ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तय्यब अन्सारी (रा. बगाडी, झारखंड) व सगीर अन्सारी (रा. करोडीह, झारखंड) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी सगीर अन्सारी यास झारखंडयेथून ताब्यात घेतले. दरम्यान, पंकज रमाशंकर सिंग (३२, रा. कारकेंद, जि. धनबाद, झारखंड) यास अटक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...