आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:धुडगूस घालत दोघांवर चाकूने‎ वार करणारे चार जण ताब्यात‎‎

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून मध्यरात्री रोडवर‎ टवाळखोरांनी धुडगूस घातल्याचा प्रकार‎ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या‎ टवाळखोरांकडून कचेरी रोडवर दोघांना‎ मारहाण करण्यात आली होती. दरम्यान,‎ याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास‎ करीत चौघांना अटक केली आहे.‎ २८ फेब्रुवारी रोजी लग्न समारंभ आटोपून‎ रात्री संदीप लिंगायत आणि अक्षय गवळी हे‎ घराकडे जात होते. त्या वेळी कचेरी रोडवर‎ पाच ते सहा जण उभे होते. या वेळी किरकोळ‎ कारणावरून वाद झाला. यानंतर त्यांनी या‎ दोघांवर हल्ला केला.

दोघांना पाच ते सहा‎ जणांनी फिल्मीस्टाइल मारहाण केली. या‎ मारहाणीत दोघेजण जखमी झाले असून‎ त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.‎ दरम्यान, याप्रकरणी संदीप लिंगायत यांच्या‎ फिर्यादीवरून कदीम जालना पोलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल करण्यात आला होता. या‎ मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद‎ झाली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा‎ छडा लावण्यात कदीम जालना पोलिसांना‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यश आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या‎ मदतीने चौघांना अटक केली आहे, तर एक‎ आरोपी अद्यापही फरार आहे.

पोलिसांनी‎ अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयात‎ हजर केले असता, त्यांना तीन दिवसांची‎ पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दोन‎ आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना‎ बालसुधारगृहात पाठवण्यात येणार‎ असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही‎ कारवाई कदीम जालना पोलिस ठाण्याचे‎ पोलिस निरीक्षक सय्यद मजहर, उपनिरीक्षक‎ ज्ञानदेव नागरे, सय्यद खलील, रामेश्वर‎ राऊत, संदीप चव्हाण, अजीम अन्सारी यांनी‎ केली आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींवर‎ ३०७ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...