आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोती तलावातील मासे मृत पावल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकाराची दखल घेतली असून त्यांनी मृत माशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत, तर दुसरीकडे पालिकेने शनिवारी सर्व मासे गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. जवळपास चार टन मासे मृत पावल्याचे समोर आले आहे. शहरातील मोती तलावाच्या पाण्यावर मृत मासे तरंगत आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला होता. या प्रकाराने एकच खळबळ उडाली. पालिकेने याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली. त्यानंतर मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मोती तलावाची पाहणी करून मृत माशांचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. मासे तपासणीसाठी घेत असतानाच मंडळाने मोती तलावाची पाहणी केली. यात प्रथमदर्शनी त्यांना कोणत्या मार्गाने प्रदूषण झाले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र माशांचे नमुने तपासल्यानंतर मासे कशामुळे मृत पावले हे लक्षात येणार आहे.
दुसरीकडे जालना नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने शनिवारी सकाळी सर्व मासे एकत्र करून त्याची डंपिंग ग्राउंडवर विल्हेवाट लावली. दरम्यान, शनिवारी नव्याने मासे मृत पावल्याचा प्रकार घडलेला नाही अशी माहिती पालिकेच्या स्वच्छता विभागातून देण्यात आली. दुसरीकडे मोती तलावात वाहने धुण्याचा आणि कपडे धुण्याचा प्रकार शनिवारीही सुरूच होता. त्यामुळे हे तातडीने थांबवण्यात यावे अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.दरम्यान, मोती तलावातून शनिवारी स्वच्छता विभागाने मृत मासे एकत्र करून त्याची विल्हेवाट लावली. हे मासे जवळपास चार टन होते.
मृत मासे पालिकेत टाकू शहरातील मोती तलावात मृत मासे वरती काढून नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ते गांधीनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली उघड्यावर आणून टाकले. हा मुक्या प्राण्यांसह नागरिकांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार असून या माशांची तात्काळ योग्य रीतीने विल्हेवाट न लावल्यास थेट पालिकेत आणून टाकू, असा इशारा अमजद खान यांनी दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.