आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमी:ओम साईराम कंपनीत क्रेन पडून चार कामगार जखमी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील ओम साईराम स्टील कंपनीत क्रेन पडून चार कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या जखमींना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे.

जालना शहरातील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्यांमध्ये स्फोट होणे, कामगार जखमी होणे या घटना सातत्याने घडत आहेत. चार दिवसांपूर्वीच या कंपनीत स्फोट होऊन एक ठार, तर पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास क्रेन पडून चार जण जखमी झाले. अपघात झाल्यानंतर तत्काळ जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यातील एक कामगार हा गंभीर जखमी असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...