आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगामात बी-बियाणे तसेच खतांची विक्रीदरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. आठ तालुके तर एक भरारी असे एकूण नऊ पथके असून या पथकाने मागील पंधरवड्यात कारवाई करून पाच कृषी सेवा केंद्रचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत. खरीप हंगाम २०२२ साठी शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्ह्यात नऊ पथके तयार करण्यात आली आहे. गैरप्रकार थांबवण्यासाठी या पथकांसाठी जिल्ह्यात बियाणे १०५, खते ६५ आणि कीटकनाशके १२ नमुने तपासणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मेअखेर बियाणे ११५, खते ५१ व कीटकनाशके १० नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेस पाठवण्यात आले. यातील बियाण्यांंचे ७ नमुने व खताचा १ नमुना अप्रमाणित आढळून आला.
यातील अप्रमाणित आढळून आलेल्या बियाणे लॉटच्या ५०६.६० क्विंटल बियाणे तसेच २५ मे टन खतास विक्री बंद आदेश देण्यात आले. जिल्ह्यात या खरीप हंगामात एकूण ५ कृषी सेवा केंद्राविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आले आहेत. ज्यामध्ये २ बियाणे, १ खत व एक कीटकनाशकाचा समावेश आहे. गुन्हा नोंदविलेल्या कृषी सेवा केंद्रातील २५ एचटीबीटी, एचटीबीटी सं. कापूस पॉकेट्स, १५ मेट्रीक टन खत व ५२ लिटर कीटकनाशक एवढा साठा जप्त करण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.