आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आ. कैलास गोरंट्याल यांचे प्रयत्न:माउलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी भाविकांसाठी केली मोफत व्यवस्था

जालना25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीक्षेत्र पंढरपुर ते श्रीक्षेत्र आळंदी माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी जालना येथून भाविकांसाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांनी ३ नोव्हेंबरपर्यंत ज्ञानेश्‍वर माऊली गुरूकुल गोपीकिशननगर जालना येथे नांव नोंदणी करावी असे आवाहन मंदीराचे पुजारी योगीराज महाराज लोखंडे यांनी केले आहे. श्रीक्षेत्र पंढरपुर ते श्रीक्षेत्रआळंदी माऊलीच्या संजीवन सोहळ्यासाठी पंढपुराहून पायी दिंडी ८ नोव्हेंबर रोजी निघणार आहे. जालना येथून भाविकांचा जत्था ३ नोव्हेंबर रोजी पंढरपुर येथे जाणार आहे. या श्रीक्षेत्र पंढरपुर, श्रीक्षेत्रआळंदी, श्रीक्षेत्रपैठण, श्रीक्षेत्र त्रिंबकेश्‍वर, श्रीक्षेत्र देहु, श्रीक्षेत्र मुक्ताईनगरची वारीची परंपरा २००१ पासून आहे. कोरोना काळातही शासनाच्या नियमाप्रमाणे वारीची प्रथा परंपरा सुरूच होती.

या समाधी सोहळ्यासाठी मोफत व्यवस्था आ. कैलास गोरंट्याल, खुशालसिंह ठाकुर, अप्पासाहेब चव्हाण, भास्कर दानवे, राजेश राऊत, अरविंद चव्हाण, अंकुश राऊत, बजरंग भक्कड, राजेंद्र भक्कड, संजय शेजुळ, संजय भरतीया, इंजि. श्रीपाद रत्नपारखी, कैलासचंद भनानी, जगदीश सिंधी, अरूण अग्रवाल, महावीर ढक्का, जगदीश नाथानी, राम पल्लोड, अनिल सोनी, रमेश तोतला, शिवरतन मुंदडा, गोविंदप्रसाद मुंदडा, कपील गजबी, मनोहर गेही, श्रीप्रकाश मालपाणी, राजेश सोनी,प्रविण मोहता, अशोक खत्री,जगदीश नाथानी, रमेशभाई पटेल, विजय कनुजे, गोविंद अग्रवाल, विजय राठी, महावीर रूणवाल, शिवकांत अग्रवाल, फुलचंद भक्कड, नंदुसेठ बंराजलेवाला, ओमप्रकाश मंत्री, जयनारायण करवा, निवृत्ती पाचफुले, वामन राऊत, सुनिल कुलकर्णी, अतीन सकलेचा, इंदरचंद तवरावाला, रमेशचंद्र देविदान, सुभाषचंद्र देविदान, चंपालाल भगत, गौतम आबड, चंद्रकांत उबाळे, संजय दाड, बाबुराव सतकर, बाबुराव व्यवहारे, विष्णु पाचफुले आदींनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...