आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:इनरव्हीलतर्फे हाडांची मोफत तपासणी शिबिर

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इनरव्हील क्लब आणि किर्ती आयुर्वेदिक क्लिनिक, धुतपापेश्वर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी हाडांच्या तपासणीसाठी मोफत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. ऑस्टीओपोरोसिस हाडांची अशी अवस्था आहे , ज्यामध्ये हाडांचे घनत्व कमी होते आणि हाडे ठिसुळ होऊ लागतात , हाडे कमकुवत होऊ लागतात. त्याच्या परिणामी हाडांच्या आजारांची सुरुवात होते. या आजारामध्ये शरिरात हाडांची घनता कमी होऊन हाडे ठिसुळ होण्याची प्रक्रिया चालू असते. परंतु त्याची कोणतीही लक्षणे सुरुवातीला जाणवत नाहीत. स्त्रियांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा बऱ्याच अधिक प्रमाणात असते.

ऑस्टीओपोरोसिसच्या कारणांमद्धे रजोनिवृत्तीनंतर होणारे हारमोन्स मधील बदल कॅल्शियम तसेच डी जीवनसत्वाची कमतरता आणि काही दिर्घ आजारांच्या परिणामी हाडे ठिसुळ होऊ लागतात. त्याच्या परिणामी कंबर दुखी , गुडघे दुखी , सांधे दुखी , मनकयांचे आजार बळावतात. या शिबिरात ज्या महिलांना कंबरदुखी, सांधेदुखीच्या तक्रारी व ज्यांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांनी तपासणी करून घ्यावे. तसेच महिलांना आयुर्वेदीय पंचकर्म ट्रीटमेंटचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...