आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभोकरदन तालुक्यातील पारध येथे जीवन हॉस्पिटल व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. मुकेश राठोड, डॉ. अशोक मोहिते, डॉ. नागेश भोसीकर, सहाय्यक संतोष दुबे, जयदीप वाघमारे यांनी ३४८ रुग्णांची तपासणी करुन रुग्णांना आवश्यकतेनुसार मोफत औषधी दिली. शिबिराचे उद्घाटन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव यांनी केले.
यावेळी सरपंच कमलबाई सुरडकर, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, परमेश्वर आल्हाट, समिखा पठाण, सखाराम पाटील, बबलू तेलंग्रे, शेख शकील, गणेश लोखंडे, सुनिल डोईफोडे,जगन पाटील, बाळूनाना जाधव, बाबा पठाण, बाबुराव काकफळे, संदीप क्षिरसागर, शेख जुबेर,नासेर पठाण, गजानन लोखंडे, सतिष आल्हाट, सचिन लक्कस, प्राचार्य रामदास जोशी, रविंद्र तबडे, प्रा. गालफाडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.