आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जिल्हा रुग्णालयात झटके, मिरगी रुग्णांची मोफत तपासणी ; 0 ते 18 वयोगटात होते बाधा

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

० ते १८ या वयोगटातील झटके, मिरगी या आजारातील मोफत तपासणी शिबिर जिल्हा रुग्णालय, जालना येथे आयोजित करण्यात आले होते. यात ५५ जणांची तपासणी करण्यात आली.या शिबिरासाठी तज्ज्ञ डॉ. वर्षा वैद्य (बाल मेंदुविकारतज्ज्ञ) आणि त्यांची पूर्ण टीम होती. या शिबिरात ५५ जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ४९ जणांची ईसीजीची तपासणी करून योग्य निदान करून मोफत उपचार (औषधी, फिजिओ, विशेष शिक्षण, ओटी, समुपदेशन) करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले. उद्घाटन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रताप घोडके यांच्या हस्ते झाले.

या वेळी अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गायके, बालरोगतज्ज्ञ अधिकारी डॉ. सोनखेडकर, डॉ. उभय गोंदीकर यांची उपस्थिती होती. या शिबिराला राष्ट्रीय आरोग्य मिशनचे जिल्हा व्यवस्थापक रावसाहेब शेळके यांनी सदिच्छा भेट दिली. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. मीनल देवळे, डॉ अर्चना खंडागळे, डॉ. अंकुश डोंगरे, डॉ अमितकुमार जैस्वाल, अरुण सुर्वे, गजानन खरात, राजू खिल्लारे, श्रीधर सरकटे, वर्षा निर्मळ, तेजस्विनी वाघमारे, तौफिक पठाण यांनी परिश्रम घेतले.

आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो
डॉ. प्रताप घोडके यांनी उद्घाटन सत्रात बोलताना म्हटले की, झटके, इपिलेप्सी या आजाराबद्दल बरेच गैरसमज आहेत. त्यामुळे पालकांनी असा आजार दिसून आल्यास वेळ वाया न घालवता किंवा भोंदूबाबाकडे न जाता सरळ डॉक्टरांकडे जावे. त्यामुळे वेळेत उपचार मिळाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...