आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:काजळा येथे 224 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी; न्यू लाइफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्णालय यांचा पुढाकार

बदनापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मल क्रीडा व समाज प्रबोधन ट्रस्टच्या बदनापूर न्यू लाईफ केअर हॉस्पिटल व चिकलठाणा लायन्स नेत्र रुग्नालय यांच्या संयुक्त विद्यमाने ३ जून रोजी बदनापूर तालुक्यातील काजळा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले यात २२४ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली यातील २२ रुग्नांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

बदनापूर तालुक्यात आरोग्याचा मोठा प्रश्न असून या तालुक्यात शासनाच्यावतीने केवळ प्राथमिक आरोग्य केंद्र चालविले जाते त्यामुळे रुग्णांना इतर उपचारासाठी किंवा शस्त्रक्रियेसाठी जालना किंवा औरंगाबाद येथे जावे लागते,ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन काजळा येथे डॉ.देवेश पाथ्रीकर यांनी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले होते.

या शिबिरात महिला रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी सरपंच रंगनाथ देवकाते, उपसरपंच प्रकाश गावंडे, लक्ष्मण पैठणे, कृष्ण खांडेकर, गोरखनाथ शिंदे, कैलास खांडेकर, ज्ञानेश्वर बोबडे, लहू कोलकर आदी उपस्थित होते. दरम्यान, डॉ. पाथ्रीकर म्हणाले, शिबिराच्या माध्यमातून गोर गरिबांची सेवा करण्याची संधी मला मिळालेली आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रयेसाठी येणारा सर्व खर्च मीच करणार असून त्यांना एक रुपया देखील लागणार नाही, गावातील सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच ग्रामस्थांनी शिबिरासाठी विशेष सहकार्य केले आहे. बदनापूर तालुक्यातील विविध गावात अशा शिबीराला प्रतिसाद मिळत आहे.

बातम्या आणखी आहेत...