आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य:नाट्यप्रयोगासाठी निःशुल्क; महाज्योतीतर्फे तृतीय रत्न नाट्यप्रयोग आज

जालना21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ११ जून रोजी सायंकाळी ७ वाजता ‘तृतीय रत्न’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात येत आहे. या नाट्यप्रयोगासाठी निःशुल्क प्रवेश ठेवण्यात आला आहे. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या शैक्षणीक ध्येयांनी प्रेरीत सामाजिक विचारांचा प्रसार व्हावा, त्यांच्या समाज प्रबोधनासाठीच्या प्रयत्नांचे मोल कळावे या हेतूने महाज्योतीच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात महात्मा ज्योतीबा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ नाटकाच्या प्रयोग सादर करण्यात येत आहेत.

अनिरुद्ध वनकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले असून क्रीएटीव्ह हेड प्रा. संगीता टिपले आहेत. एकुण ३० कलाकार व सहकाऱ्यांचा या नाटकात सहभाग असणार आहे. याआधी विविध जिल्ह्यात ३१ प्रयोगाचे यशस्वी आयोजन करण्यात आलेले आहे. या नाट्यप्रयोगास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकीय संचालक महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...