आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य तपासणी:जळगाव सपकाळ येथे मोफत आरोग्य तपासणी

जळगाव सपकाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव सपकाळ येथे मेट्रोफिनिक्स, दहिफळे हाँस्पीटल व लायन्स हॉस्पीटल संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांनी लहान मुले, पुरुष, महिला तसेच जेष्ठ नागरिक असे ५४२ नागरिकांची तपासणी केली. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया २२ जणांवर करण्यात येणार असून १२ जणांची अँजिओग्राफी केली जाणार आहे. एकंदरीत हृदय रोग, ईसीजी, रक्तदाब, सर्जरी, मूत्रपिंड, मुतखडा, मूत्रमार्ग विकार, सांधे व फुफ्फुसाचे विकार, अस्थमा, नेत्र तपासणी, मान, पाठ, कंबरदुखी, पॅरालिसिस, चक्कर येणे, डोकेदुखी, जीर्ण व्याधी आजार तपासणी, दिव्यांग व्यक्तीची तपासणी आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या.

यावेळी सरपंच केतन साळवे, उपसरपंच रमेश सपकाळ, डॉ. शालिकराम सपकाळ, प्रभुदेवा, विष्णू सपकाळ, रवींद्र सपकाळ, भागाजी सपकाळ, बालू बुरकुले, के. के. सपकाळ, माणिकराव सपकाळ, बाबू सपकाळ, गोपाळ गोट्वाल, अनिल सपकाळ, जगन सपकाळ, सुभाष सपकाळ, शंकरराव सपकाळ, विष्णू सपकाळ, नायबराव सपकाळ, सुनिल नेमणे, भरत गुरुजी, पुरुषोत्तम सपकाळ, रामू मुट्ठे, गोपाळ राजपूत, गोकुळ सपकाळ, पप्पू सपकाळ, नामदेव सपकाळ, सुभाष सपकाळ आदींची उपस्थिती होती.शिबिरात दहिफळे हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ञ डॉ. अजय उक्कडगावकर, गणेश चोले, पांडव, डॉ. राऊत, योगेश निकाळजे, मुस्ताक शेख, पुरी यांनी तपासणी केली.

बातम्या आणखी आहेत...