आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात मार्गदर्शन; लायन्स क्लब व आशीर्वाद हॉस्पिटलचा उपक्रम

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लायन्स क्लब ऑफ जालना आणि आशीर्वाद सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल जालना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (५ जून) आयोजित मोफत वंध्यत्व निदान व निवारण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा झंवर आणि डॉ. गोविंद झंवर यांनी या शिबिरात सहभागी ५० जणांची तपासणी केली, अशी माहिती लायन्स क्लबच्या अध्यक्षा मीनाक्षी दाड यांनी दिली.

शिबिरात सहभागी ५० जणांची रक्त, लघवी तपासणी मोफत करण्यात येऊन, गरज असलेल्या रुग्णांची ५० टक्के सवलतीच्या दरात सोनोग्राफी चाचणी करण्यात आली. या शिबिरात १० रुग्णांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला असून त्यांना ५० टक्के सुविधा शिबिराच्या माध्यमातून देण्याचा निर्णय डॉ. झंवर दांपत्याने घेतला आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी लायन्स क्लबच्या अध्यक्ष मीनाक्षी दाड, सचिव जयश्री लढ्ढा, कोषाध्यक्ष प्रेमलता लोया, डॉ. गोविंद झंवर, डॉ. श्रद्धा गोविंद झंवर, प्रकल्पप्रमुख कविता शर्मा, कृष्णा लढ्ढा, सदस्य श्याम लोया, विजय दाड, रवींद्र शर्मा, संगीता शर्मा, संगीता रुणवाल, वंदना मुंदडा, योगेश उजवणे, पॅथाॅलाॅजिस्ट डॉ. कैलाश सचदेव आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविकपर भाषणात मीनाक्षी दाड यांनी या शिबिराचा उद्देश विशद करून, मूलबाळ होत नसलेल्या दांपत्यांनी वेळीच तपासणी करून उपचार सुरू केल्यास मूल होण्याचे स्वप्न साकार होऊ शकते, असे सांगून यापुढेही आशीर्वाद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने अशी शिबिरे घेण्याचा प्रयत्न करू, असा मनोदय व्यक्त केला. डॉ. श्रद्धा झंवर यांनी वंध्यत्वाची कारणे, उपाय व उपचार पद्धतीची माहिती देऊन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरजूंवर वंध्यत्व निवारणाच्या शस्त्रक्रिया आणि चाचण्या सवलतीच्या दरात करू, अशी ग्वाही दिली.

बातम्या आणखी आहेत...