आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्जरी शिबिर:मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर;  आठ जानेवारीपर्यंत करा नोंदणी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रोटरी क्लब ऑफ जालनातर्फे १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जालन्यात मोफत प्लास्टिकरा सर्जरी शिबिचे आयोजन करण्यात आले आहे. जात जन्मतः दुभंगलेले ओठ, टाळू व जळीत रुग्णांवर प्लास्टिक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. यासाठी ८ जानेवारी रोजी पर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मागील १७ वर्षांपासून रोटरी क्लब जालनातर्फे जर्मन डॉक्टरांच्या सहकार्याने मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

आतापर्यंत ६ हजार रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे. मागील दोन वर्षांपासून कोविड परिस्थितीमुळे शिबिराचे आयोजन करता आले नव्हते. यावर्षी मात्र व्यापक प्रमाणात शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, पूर्वतपासणी ८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता जालना मिशन हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे. शिबिराच्या आधी ८ जानेवारी रोजी पूर्वतपासणी आणि नाव नोंदणी करणे रुग्णास बंधनकारक आहे.

जन्मतः दुभंगलेले ओठ आणि टाळू, जळीत रुग्णांनी मिशन हॉस्पिटल येथे नोंदणी करून या निशुल्क सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ जालनाचे अध्यक्ष किशोर देशपांडे, सचिव प्रशांत महाजन, प्रकल्प प्रमुख अभय नानावटी, जालना मिशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. डी. मोजेस यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...