आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शस्त्रक्रिया:मोतीबिंदू निष्पन्न झालेल्या नेत्ररुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया, देशमुख यांची माहिती

भोकरदन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन येथील श्री गणपती टेक्निकल इन्स्टिट्यूशन मध्ये नेत्रतपासनी शिबीर संपन्न झाले यात २१३ रूग्णांची तपासणी करण्यात आली त्यामधून ८४ रूग्णांना मोतीबिंदू असल्याने लवकरच त्यांच्या वर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात असे काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ यांनी सांगीतले. भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्था संचलित श्री गणपती टेक्निकल इन्स्टिट्यूशन भोकरदन व लायन्स क्लब रूग्णालय, चिखलठाणा औरंगाबाद यांच्या संयुक्त विधमाणे भोकरदन तालुक्यातील नागरिकांचे मोफत नेत्रतपासनी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये एकूण २१३ रूग्णांची नेत्रतपासनी करण्यात आली असून त्यापैकी ८४ रूग्णांना मोतीबिंदू झाल्याचे निष्पन्न झाले, लवकरच औरंगाबाद येथील लायन्स क्लब चिखलठाणा येथे मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी दळवी, प्राचार्य रोजेकर, उपप्राचार्य, रुग्णालयाचे डॉ काळे व त्यांचे सह डॉ, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, प्रा डॉ विश्वास तळेकर, एच व्ही नागरगोजे,रोषण देशमुख यांची उपस्थिती होती. शिबीर यशस्वी करण्यासाठी रमेश जाधव, पंजाबराव देशमुख, हमद अलमोदी चाऊस,गुणरत्न मगरे,नागेश घुगे,दिलीप जगताप, विष्णू भालेराव,काळे,रत्न ठाले यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...