आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोफत उपचार:भोकरदन येथे आयोजित निसर्गोपचार शिबिरात रुग्णांवर मोफत उपचार

भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन शहरातील रत्नमाला लाॅन्स येथे मित्र मंडळातर्फे निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भोकरदन येथील श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख सुदेश थारेवाल, डॉ.श्रीराम कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष ॲड. हर्षकुमार जाधव, सौ.भाग्यश्री जाधव, सुप्रियाताई देशमुख, वदंना शिंदे, उषा इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीरामध्ये जगप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ.श्रीराम कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णांवर मोफत उपचार केले.

मधुमाशीच्या डंखाद्वारे रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. शिबीरात भोकरदन शहर व परिसरातील चारशे रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला.शिबीराचे संचलन प्रा.नारायण जिवरग यांनी केले.शिबीर यशस्वी करण्यासाठी मित्र मंडळाचे विलास शिंदे, जयंतराव जोशी, फैसल चाऊस,राजु इंगळे, विकास जाधव,शुभम राजपूत, ओंकार देशपांडे, राजेंद्र देशमुख यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...