आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरणा व मार्गदर्शन:रोजगार निर्मितीवर मोफत वेबिनार ; बेरोजगारांनी सहभागी होण्याचे आवाहन

जालना24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगार करण्याबाबत उद्योजकता जाणीव, प्रेरणा व मार्गदर्शन होण्यासाठी “चला उद्योजक होऊ या!” या शृंखलेअंतर्गत कृषी प्रक्रिया उद्योगातून रोजगार निर्मिती या विषयावर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन १३ सप्टेंबर मंगळवारी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम कार्यालयाच्या https://www.facebook.com/JalnaSkillDevelopment या फेसबुक पेजवरून थेट ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र, जालना यांचे शास्त्रज्ञ-अन्न तंत्रज्ञान, शशिकांत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या युवक -युवतीना व शेतकरी यांना दालमिल, मोसंबी, आवळा, सीताफळ, आंबा, भाजीपाला व दुग्ध अशा विविध कृषी विषयक उद्योग प्रक्रिया माहिती तसेच कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबाबत तज्ज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या अनुषंगाने सहभागी उमेदवारांना फेसबूक पेजवर कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न विचारता येतील. याची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येतील. या मार्गदर्शनाचा लाईव्ह लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगार ईच्छूक युवक-युवती यांनी या कार्यालयाच्या JalnaSkillDevelopment या फेसबूक पेजला फॉलो करावे आणि लाईव्ह सहभागी व्हावे. या मध्ये काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी ०२४८२-२९९०३३ अथवा jalnarojgar@gmail.com या ई- मेलवर संपर्क साधावा, असे आवाहन कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. जालना जिल्ह्यातील बेरोजगारांनी या मोफत वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...