आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती साजरी:राष्ट्रमाता महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी मौलाना आझाद यांची जयंती साजरी

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय जालना येथे ११ नोव्हेंबर रोजी भारताचे प्रथम शिक्षणमंत्री आणि स्वातंत्र्यसेनानी शिक्षणतज्ज्ञ मौलाना अब्दुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. शेख वाहब यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मोलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. मौलाना अब्दुल कलाम यांच्या जीवनावर प्रा. डॉ. शेख वाहव आणि प्राचार्या डॉ. सुनंदा तिडके यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. पी. टी. चव्हाण यांनी तर प्रा. भीमराव वाघ यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...