आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील गुरुप्रसादनगर व शिक्षक कॉलनीत मागील एक महिन्यापासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना नियमित वीज बिल भरणा करूनही वीज समस्येचा सामना करावा लागत आहे. या भागातील नागरिक लोडशेडिंगच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. लोडशेडिंगमुळे घरातील विद्युत उपकरणे आणि नळाच्या पाण्याच्या मोटार जळत आहेत.
शिवाय विद्यार्थ्यांना विजेअभावी रात्रीच्यावेळी अभ्यास करता येत नाही. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी या भागातील विजेच्या समस्येकडे लक्ष देऊन तांत्रिक दुरुस्ती करावी, अशी मागणी सी. एन. मुंडे, डॉ. मारुती घुगे, दत्ता घोगरे, के. बी. घोगरे, एस. एस. साबळे, डी. पी. राऊत, बी. एन. मिरकड, मधुकर बागल, डी. बी. देशमुख, सर्जेराव गडदे, भगवान नाटकर, विष्णू इप्पर, सोमेश्वर बुलबुले, अजय पाटील, किरण कुलकर्णी, दत्तात्रय राऊत यांच्यासह आदींनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.