आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी:दाभाडी येथे वीजपुरवठा वारंवार खंडित; महावितरणचे कर्मचारी फिरकेनात

दाभाडीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बदनापूर तालुक्यातील चिखली (दाभाडी) या गावासाठी दाभाडी येथील सबटेशनमधून विद्युत पुरवठा करण्यात येतो. चिखली गावासाठी चार रोहित्रे असून सिंगल फ्यूजच्या रोहित्रावरून थ्री फेज होल्टेजचा पुरवठा केला जातो.

मागील काही दिवसांपासून या परिसरात विजेचा सतत लपंडाव होत असून काही तांत्रिक अडचण आल्यास वीज कर्मचारी इकडे फिरकत देखील नाहीत. यामुळे ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागतो. चिखली गावचे लाइनमन मुख्यालयाच्या ठिकाणी न राहता बदनापूर येथे राहू तांत्रिक अडचण आल्यास गावात खासगी व्यक्तीला त्यांनी जबाबदारी दिली आहे. याप्रकरणी चौकशी करून पूर्णवेळ लाइनमन नियुक्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...