आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तब्बल 15 वर्षांनंतर मित्र-मैत्रिणी आल्या एकत्र ; अभ्यासही केला

भोकरदनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील न्यू हायस्कूलच्या दहावी २००७ बॅचचा स्नेहमिलन कार्यक्रम “चला भेटुया” मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल पंधरा वर्षानंतर मित्र मैत्रिणी यानिमित्ताने एकत्र आले. या विशेष मेळाव्यात शाळेचा तो दिवस पुन्हा एकदा जिवंत करण्यात आला. शाळेची घंटा वाजली विद्यार्थी अगदी पळत शाळेत आले. सोबत राष्ट्रगीत झाले, प्रतिज्ञा झाली, पीटीचा तास झाला. उशिरा येणाऱ्यांना शिक्षा सुद्धा झाली आणि वय वर्ष ३०-३१ असणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी दिलेली शिक्षा अगदी हसत हसत हसत कबूल केली.

प्रत्येक शिक्षकाचे तास झाले आणि प्रत्येक तासामागे घंटा वाजली मध्यंतराचे जेवण डब्बा पार्टी सारखे झाले. त्यानंतर परत शाळा भरली धिंगाना झाला आणि नंतर विद्यार्थ्यांनी निरोप घेतला. यात कुणी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, उद्योगपती, अभिनेता, व्यवसायिक कुणी शेतकरी काही गृहिणी तर आपल्या चिल्ल्या-पिल्ल्यांसह आल्या होत्या. मजा मस्ती झाली हास्यकल्लोळ झाला. आपल्या हाताखाली घडलेले विद्यार्थी किती मोठे झाले हे बघून शिक्षकांचाही कंठ दाटून आला.

या निमित्ताने सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले तर माजी विद्यार्थी शेख शोएब यांनी १० मुलांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याची जबाबदारी घेतली. याशिवाय “न्यू हायस्कुल २००७ फाउंडेशन” तयार करून शैक्षणिक दृष्ट्या गरजू मुलांचे पालकत्व घेण्याचा प्रस्ताव ठेवला. कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक एस. डबल्यू. घोड़के, पहाडे, घावटे, सुदाम गाडेकर, दांडगे, खरात, पाटील, पाटे, खेडकर, अहिरे, आरख, शेख, सुसर, वाघ, महाजन, पवार, भाले, रमेश मिरकर, टी. बी. पाटील, टेकाळे, धनंजय मोरे, गवळी, दहिजे, लिपने यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी अनिकेत गंगवाल, ईश्वर जाधव, राहुल देशमुख, मयूर बाकलीवाल, गणेश पडोळ, अर्चना गिरी, गीतांजली अवकाळे, सुनीता लिपने, सोनम सोनवणे यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...