आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिटीचे वाटप:पोलिस मित्रांनी कान, डोळे होऊन पोलिसांना सहकार्य करावे ; राजू मोरे यांचे प्रतिपादन

मंठा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संपूर्ण तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस मित्रांनी पोलिस प्रशासनाचे कान आणि डोळे होऊन सहकार्य करावे, असे प्रतिपादन उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी केले.मंठा येथील पोलिस ठाण्यात निवड करण्यात आलेल्या १०० पोलिस मित्रांना टी-शर्ट, टोपी आणि शिट्टीचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिस उपअधीक्षक संजय व्यास, पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित पोलिस मित्रांना मार्गदर्शन करताना राजू मोरे म्हणाले की, पोलिस मित्रांनी सण उत्सवाच्या काळात तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी, नैसर्गिक आपत्तीमध्ये, अपघातग्रस्तांना मदत करणे, पीडितांना मदत करणे, तालुक्यातील गावांची संख्या आणि पोलिसांची संख्या लक्षात घेता, प्रत्येक ठिकाणी पोलिस वेळेवर पोचतील असे नाही. परंतु एखाद्या घटनेची वेळीच माहिती दिली, तर पोलिसांना तत्काळ पाठवून सहकार्य करता येते.

सर्व पोलिस मित्रांचा व्हाॅट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार असून याद्वारे सर्व पोलिस मित्र पोलिसांच्या संपर्कात असतील. यामुळे तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था उत्तम प्रकारे हाताळण्यासाठी पोलिसांना सहकार्य मिळणार आहे.या वेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलिस मित्रांना त्यांच्या कर्तव्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कायदा हातात न घेता कायद्याच्या चौकटीत राहून पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलिस मित्रांना मार्गदर्शक सूचना दिल्या. या वेळी फौजदार बलभीम राऊत, आसमान शिंदे, दापाली शिंदे, दीपक आढे, प्रशांत काळे, आनंद ढवळे, शंकर राजाळे, श्याम गायके आदींची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...