आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाआड:सराफाला लुटणारे गजाआड; चौघांच्या मुसक्या आवळल्या, दोघे टाळत होते घराबाहेर पडणे, एकाने केले टक्कल

जालना15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंठा रोडवरील राममूर्तीजवळ सराफा व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तसेच अग्निशस्त्राचा धाक दाखवून दागिने व रोख रक्कम असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल पळविला होता. यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दिवस-रात्र पाळतीवर राहून चार आरोपींना जेरबंद केले आहे.

व्यापाऱ्याला लुटल्यानंतर पोलिसांना आपला सुगावा लागू नये म्हणून तिघेजण शहरात जास्त न फिरता ओळख लपवित होते. तर मुख्य आरोपीने पोलिसांना सापडू नये म्हणून टक्कल करून फिरत होता.

अभिजित दुर्योधन राठोड (सोमनाथ जळगाव तांडा, ता. जालना), अभिजित राजेश पवार (रामनगर), पवन भास्कर कायंदे (गणपती गल्ली, जालना), सुदाम प्रकाश राठोड (सोमनाथ तांडा, ता. जि. जालना) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. रामनगर येथील सोन्याचे दुकान बंद करून व्यापारी अभिजित पुरुषोत्तम दुसाने हे दागिने व रोख रक्कम घेऊन जालन्याकडे येत होते. दुचाकीवरून आलेल्या चार जणांनी त्यांच्या डोळ्यात पूड टाकून व अग्निशस्त्राचा धाक दाखवून दागिणने पळविले होते.

बातम्या आणखी आहेत...