आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात जंगी स्वागत:मेहनत अन् चिकाटीच्या बळावर शेलूदच्या गजाननला सैन्यात संधी

शेलूद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील शेलुद येथील गजानन पंजाबराव सोनुने यांने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अभ्यासात एकाग्रता ध्येय निश्चितीकडे लक्ष्य देऊन इंडियन आर्मीच्या पुर्ण परीक्षेत यश मिळवुन इंडियन आर्मीत निवड झाली आहे. जिद्द चिकाटी सातत्याने अभ्यास आणि आर्मीचा पुर्ण सराव करत आर्मीत भरती झाला. यामुळेच यश मिळवले असल्याने गजानन याने सांगितले. मागील दोन पासुन कोरोना महामारी मुळे खोळंबलेल्या सर्वस्तरातील भरती बंद होती. यावर्षी या भरतीला सुरूवात झाली. भरतीच्या वेळेस मुख्य परीक्षेत गजानन याने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.

शेतकरी पंजाबराव सोनुने यांचा मुलगा गजानन यांचे आर्मी बनण्याचे स्वप्न होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो देखील प्रयत्न करीत होता. २०१९ पासुन गजानन सातत्याने इंडियन आर्मीचा अभ्यास व सराव करीत होता. आर्मीची परीक्षेत पहिल्याच वेळी उतीर्ण झाला आहे. आपल्या प्रयत्नाने खचून न जाता त्यांने जिद्द व चिकाटी आणि स्वतः च्या विश्वासावर ठाम राहिला.

लोकसेवा आयोगाच्या लोकसेवा परीक्षेसाठी करण्यात आलेला बदल प्रश्न विचारणांच्या पद्धती वेळेचे नियोजन असा चिकीत्सक अभ्यास करत यशा पर्यंत पोहोचला. गजानन हा भुमीहीन असून घरचा सर्व भार गजानन वर होता. त्यांचे आई, वडील पंजाबराव, आणि लहानी बहिण सुद्धा आर्मीत भरती होण्यासाठी भर्तीपुर्वी सराव करत आहे. गजानन हा भुमीहीन असून घरचा सर्व भार गजानन वर होता. त्यांचे आई, वडील सुलोचना, पंजाबराव, आणि लहानी बहिण सुद्धा आर्मीत भरती होण्यासाठी भर्तीपुर्वी सराव करत आहे.

बातम्या आणखी आहेत...