आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गांधीगिरी:आष्टीत ग्रामस्थांचे गांधीगिरी आंदोलन; अभियंत्यांचा सत्कार, निवेदनही दिले

आष्टी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परतुर तालुक्यातील आष्टी येथील सातारा रोड वसाहत भागात चार महिन्यांपासून सिंगल फेज रोहीत्र मिळत नसल्याने गांधीगिरी आंदोलन करीत महावितरणचे सहायक अभियंता नामदेव केंद्रे यांना हार घालून निवेदन देण्यात आले.आष्टी येथील सातारा वसाहत रोड भागात मागील चार महिन्यांपासून येथील सिंगल फ्युज रोहित्र जळाल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विज वितरण कर्मचारी, अधिकाऱ्यांना यांना या बाबतीत वारंवार पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष करित होतें. दळण, पाणी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या व विज वितरणाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून गुरूवारी नागरिकांनी गांधीगिरी आंदोलन करित आष्टी येथील नागरिकांनी सहाय्यक अभियंता नामदेव केंद्रे यांना हार घालून निवेदन सादर केले.

नागरिकांच्या असलेल्या समस्येबाबत ग्रामस्थांनी वरीष्ठांचे लक्ष वेधण्यासाठी ही गांधीगिरी केली. आता तरी ग्रामस्थांच्या समस्येची गंभीर दखल घेऊन त्वरित रोहित्र बसवून विजपुरवठा सुरळीत करावा नसता महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी मणियार, मोबीन कुरेशी, निसार शेख, कलीम पटेल, अजिम शेख, इसाक शेख यांच्यासह २२ नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...