आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनविरोध निवड:अकोला देव येथील सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश सवडे; ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

टेंभूर्णी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाफराबाद तालुक्यातील अकोला देव येथील विविध कार्यकारिणी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी गणेश सवडे तर व्हाईस चेअरमनपदी गंगुबाई सवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी दादाराव सवडे, दादाराव सवडे, भगवान सवडे, रघुनाथ कदम, प्रकाश घोडसे, गजानन उगले, महानंदा देशमाने, शिवाजी सवडे, विष्णू छडीदार, कल्पना मोढेकर आदींचा संचालकामध्ये समावेश आहे.

यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दादाराव सवडे, प्रा. डॉ. रामेश्वर सवडे, किसनराव सवडे, शंकर सवडे, रघुनाथ कदम, रामराव मोठेकर, बालाजी मोढेकर, भगवान सवडे, रामेश्वर सवडे, विकास घोडसे, शुभम घोडसे, नवनाथ ढवळे, संपत छाडिदार, बालाजी मोढेकर, भगवान सवडे, अनिल सवडे आदींची उपस्थिती होती. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुभाष राठोड, भुजंगराव पिंपळे, डोईफोडे यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...