आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात काढावी ; हुल्लडबाजी केल्यास कारवाई

पिंपळगाव रेणुकाई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत आहे. भोकरदन तालुक्यातील पारध पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या ३२ खेड्यापैकी १४ गावात एक गाव एक गणपती ही संपल्पना राबविण्यात आली आहे, तर उर्वरीत गावात ६४ गणेश मंडळे स्थापन झाली आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी कुठेही अनुचीत प्रकार घडू नये, म्हणून पारध पोलिस ठाण्यातर्गंत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या दिवशी कुठल्याही मंडळाने डिजे वाजवून धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एपीआय अभिजीत मोरे यांनी दिला. सध्या गावागावात गणेश उत्सवाची धूम सुरू आहे.

अनेक गणेश मंडळानी सामाजिक उपक्रम राबवीत महाप्रसादाचे देखील आयोजन यंदा केले आहे. दरम्यान, विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील धावडा, वालसांवगी, पिंपळगाव रेणुकाई, अवघडराव सांवगी, पारध खुर्द आदी गावात रुट मार्च काढण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरिक्षक रमेश रुपेकर, बिट जमादार प्रकाश सिनकर, प्रदिप टेकाळे, निलेश खरात, जीवन भालके, दिनेश पायघन, सुरेश पडोळ, लक्ष्मण राणगोते, संतोष जाधव, रानमाळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...